आज राष्ट्रवादी काँग्रेसचा 25 वा वर्धापनदिन आहे. दिल्ली येथील कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे.राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी पक्षाचे नवे कार्यकारी अध्यक्ष असणार आहेत. त्यांची निवड करण्यात आल्याची घोषणा खुद्द शरद पवार यांनी केली आहे.
प्रफुल्ल पटेल यांच्यावर मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, गोवा आणि झारखंड राज्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे तर सुप्रिया सुळे यांच्यावर महाराष्ट्र, हरियाणा, तरूण-तरूणी आणि लोकसभेची जबाबदारी दिली आली आहे.
काही दिवसांपुर्वी शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना राजीनामा मागे घेण्यास भाग पाडले.सर्वांच्या मताचा मान ठेवून शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला होता.












