पुणे महानगरपालिकेने नागरिकांकडून मालमत्ता कराचा वेळेवर निपटारा करण्यासाठी लॉटरी प्रणाली जाहीर केली आहे. 15 मे ते 31 जुलै 2023 दरम्यान महापालिका द्वारे नागरिकांकडून प्रलंबित कर वसूल करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे(Scheme).
या उपक्रमांतर्गत, पालिका या लॉटरी प्रणाली अंतर्गत त्यांच्या प्रलंबित कराची पुर्तता करणार्या नागरिकांना कार आणि ई-बाईक यांसारख्या भेटवस्तू देणार असल्याचे सांगितले आहे. मालमत्ता करात सध्याच्या 5% ते 10% सवलतीसाठी करदाते देखील पात्र असतील.
“लॉटरी जिंकण्याची ही तुमची संधी आहे! वेळेवर मालमत्ता कर भरा आणि लॉटरी योजनेअंतर्गत आकर्षक भेटवस्तू जिंकण्याची संधी मिळवा!” पीएमसीने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून या योजनेची घोषणा केली आहे.
कर भरा आणि लॉटरी जिंका(Scheme)












