पिंपरी(प्रतिनिधी) : आर्मी आणि उद्योग क्षेत्र दोन्ही क्षेत्र रोजगार निर्मिती करणारे क्षेत्र आहे. “उद्योगामुळे राष्ट्रनिर्मिती होते, तर आर्मीच्या सैनिकांमुळे देशाची सुरक्षा अबाधित आहे(Slogan of speech). यासाठी शिक्षण हे खूप महत्त्वाचे साधन आहे.’ असे प्रतिपादन अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल तथा परम विशिष्ट सेवा मेडल विजेते
लेप्टनंट जनरल ( निवृत्त) के. टी. परनाईक यांनी केले.
आयआयइबीएम संस्थेच्या इंडस मॅनेजमेंट कॉलेजला सदिच्छा भेट दिली.
त्यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष कर्नल ( निवृत्त) विनोद मारवाह, डॉ. जयसिंग मारवाह , अनघा परनाईक, अरुणा मारवाह, कर्नल(नि) मिर अहमद शाह, अधिष्ठाता डॉ. पूनम निकम, कर्नल (निवृत्त) रवींद्र कुमार, सह अधिष्ठाता डॉ विशाल भोळे,प्राचार्य नम्रता जियानी उपस्थित होत्या.
संस्थेच्या इमारतीची, हॉस्टेल आणि वाहन संग्रहालयाची पाहणी राज्यपालांनी केली.
राज्यपाल परनाईक म्हणाले, ‘ सैन्य दलात काम करताना सर्वप्रथम देशाचा विचार करावा लागतो. देशाला चांगल्या संशोधकांची आवश्यकता आहे. भारत देश कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जात होता. आता देशाची ओळख तांत्रिक देश म्हणून होत आहे. मागणी तशी पुरवठा असे व्यवसायाचे सूत्र होते, मात्र आता आजच्या जमान्यात पुरवठा असेल तर मागणी असे चित्र दिसून येत आहे.
इ कॉमर्स मुळे व्यवसायाचे स्वरूप बदलत असून चौकटीच्या बाहेर विचार केल्यावर चांगले संशोधन होऊ शकेल.’
‘ व्यावसायिक होण्यासाठी अंगी विविध कौशल्य असण्याची गरज असते. चांगली विचार क्षमता आणि निर्णय क्षमता निर्माण करणे हे चांगला लीडर असण्याचे लक्षण आहे.’ असे मत परनाईक यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲंड्रिया डिसूझा हिने केली
उद्योगामुळे राष्ट्रनिर्मिती तर सैन्यांमुळे राष्ट्र सुरक्षित : राज्यपाल परनाईक(Slogan of speech)












