ट्रॅव्हल कंपनीच्या कार अपघाताची तक्रार दाखल करण्यासाठी तक्रारदार गेले असता पोलिसांनी लाच मागितल्याची घटना मागे येरवडा पोलीस स्टेशन मध्ये घडली होती. या प्रकरणी अँटी करप्शन ने पोलीस स्टेशन मधील हवालदार आणि अन्य २ साथीदारांना रंगेहाथ लाच घेताना पकडले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात काही दिवसातच पोलिस दलाची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी परिमंडळ-4 चे पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate) यांनी 3 पोलिस हवालदारांना तडकाफडकी निलंबीत केले आहे. DCP शशिकांत बोराटे यांनी पोलीस दलासाठी अभिमान वाटणारी कामगिरी केली आहे.
ट्रॅव्हल्स व्यावसायिकाच्या कारचा अपघात झाला होता. कार अपघाताची तक्रार दाखल करून घेण्यासाठी व्यावसायिकाकडे २० हजार लाचेची मागणी करण्यात आली. पोलिसानी तडजोड करून 13 हजार रूपये लाच घेताना अॅन्टी करप्शनने रंगे हाथ पकडले होते.
पोलिस हवालदार राजेंद्र रामकृष्ण दिक्षीत (Police Rajendra Ramakrishna Dixit), पोलिस हवालदार जयराम नारायण सावळकर (Police Jairam Narayan Sawalkar), पोलिस हवालदार विनायक उल्गा मुधोळकर (Police Vinayak Ulga Mudholkar) अशी निलंबीत (suspend) करण्यात आलेल्यांची नावे आहेत.लाच घेताना अॅन्टी करप्शनने (Pune ACB Trap) पोलिस हवालदाराला अटक केली. या प्रकरणात 3 पोलिस हवालदारांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












