पुमा कंपनीच्या नावाने बनावट वस्तूंची विक्री करणाऱ्या वर कॉपीराईट (Copyright) चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महेंद्र सोहन सिंह हे कॉपीराईट फील्ड ऑफिसर आहेत. शनिवारी दिनांक 10 जून रोजी फिर्यादी हे माहेश्वरी ट्रेडर्स शुक्रवार पेठ तसेच नेहा स्टिकर अँड डिस्ट्रीब्यूटर बुधवार पेठ येथे पाहणी साठी गेले. माहेश्वरी ट्रेडर्स शुक्रवार पेठ येथे एकोणावीस हजार पाचशे रुपयांच्या पुमा कंपनीच्या बनावट बॅट निदर्शनास आल्या. त्याचबरोबर नेहा स्टिकर अँड डिस्ट्रीब्यूटर येथे आठ लाख रुपयांचे नामांकित कंपन्यांचे बनावट स्टिकर निदर्शनास आले.
याप्रकरणी फरासखाना पोलीस स्टेशन येथे भादविक 420 कॉपीराईट अॅक्ट 1957 चे कलम 51 63 आणि 64 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कॉपीराईट अंतर्गत गुन्हा दाखल (Copyright)












