पुणे शहरामध्ये येणा-या पालखी आगमनाचे अनुषंगाने व युनिट १ कार्यक्षेत्रात होणा-या मोबाईल जबरी चोरीच्या अनुषंगाने युनिट १ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार गुन्हे प्रतिबंध पेट्रोलिंग करून रेकॉर्डवरील गुन्हेगारां बद्दल माहिती घेत होते.ही माहिती घेत असताना पोलीस अंमलदार अनिकेत बाबर यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, हत्ती गणपती मंदिराचे समोरील बोळामध्ये सदाशिव पेठ पुणे येथे तीन इसम हे काळे रंगाचे मोटार सायकलवरून मोबाईल विक्रीसाठी येणार असुन सदरचे मोबाईल चोरीचे आहेत. ही माहिती मिळाल्या नंतर सदरची माहिती वरिष्ठांना कळविली.वरिष्ठांनी योग्य ते मार्गदर्शन करुन कारवाई करण्याचे आदेश दिले.
युनिट-१ चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी टिम तयार करून ती गणपती मंदिराचे समोरील बोळामध्ये सदाशिव पेठ पुणे येथे मिळालेल्या बातमी प्रमाणे तीन इसम आल्यानंतर खात्री झाल्यानंतर त्यांना सदर ठिकाणी सापळा लावुन छापा टाकून सदर इसमास आहे त्या स्थितीत ताब्यात घेतले.पंचासमक्ष त्यांना त्याचे नावे पत्ते विचारता त्यांनी आपले नावे व पत्ते सांगितले.
धनराज शिवाजी काळुंके ( वय २१ वर्षे रा. वाडेश्वर नगर, बॉलिवुड थिएटर जवळ वडगांव शेरी पुणे ), विरेंद्रकुमार जगदीश प्रसाद प्रजापती ( वय २५ वर्षे रा. १३, ताडीवाला रोड, मेरु हॉटेल जवळ पुणे ), किशोर सुरेश कोल्हे ( वय ३० वर्षे रा. गवळी गल्ली, सारथी शाळेशेजारी, साईनाथ नगर, वडगांव शेरी पुणे )अशी आरोपींची नावे आहेत.
आरोपींच्या ताब्यातून १,२१,०००/- चे १४ मोबाईल व ७०,०००/- रु किंची दुचाकी मोटर सायकल असे एकुण १,९१,०००/- किमतीचा माल पंचासमक्ष ताब्यात घेवुन जप्त करून पंचनामा केला आहे. त्यांचे कडून ८ गुन्हे उघडकीस आले आहेत.
आरोपींवर विश्रामबाग पोलीस स्टेशन,फरासखाना पोलीस स्टेशन,समर्थ पोलीस स्टेशन,दत्तवाडी पोलीस स्टेशन,बंडगार्डन पोलीस स्टेशन इत्यादी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
त्यांचे कडुन मोबाईल जबरी चोरीचे विश्रामबाग पो स्टे कडील २ गुन्हे, समर्थ पो स्टे कडील ३ गुन्हे फरासखाना, दत्तवाडी, बंडगार्डन पो स्टे कडील प्रत्येकी १ असे एकुण ८ गुन्हे उघडकीस आले आहे. सदर इसमांना पुढील कारवाई कामी विश्रामबाग पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे.
यातील आरोपी नामे धनराज शिवाजी काळुंके वय २१ वर्षे रा. वाडेश्वर नगर, बॉलिवुड थिएटर – जवळ वडगांव शेरी पुणे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्यांच्यावर वाहनचोरीचे एकुण ०६ गुन्हे दाखल आहे.
आरोपींवर भादवी कलम ३९२,३४ ( २ ) , ३९२ (३४),३९२ ३४ ( ४) ,३९२.३४(५) ,३९२, ३४८ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री संदिप कर्णिक मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे.. पुणे शहर श्री अमोल झेंडे मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ पुणे शहर श्री सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहा पोलीस निरीक्षक अशिष कवठेकर, पोलीस उप निरीक्षक सुनिल कुलकर्णी, रमेश तापकिर, अजय जाधव, पोलीस अंमलदार अनिकेत बाबर, राहुल मखरे, शशिकांत दरेकर, दत्ता सोनावणे, आय्याज दड्डीकर, अभिनव लडकत, इमरान शेख, निलेश साबळे, शुभम देसाई, आण्णा माने, तुषार माळवदकर व महेश बामगुडे यांनी केली आहे…












