पुणे : पुणे हे विद्येचे माहेर घर म्हणून ओळखले जाते. पुण्यामध्ये महाराष्ट्र मधलेच नाहीतर जगभरातील विध्यार्थी शिकण्यासाठी येतात. पण आता विद्येच्या माहेर घराची परिस्थिती खूप बिकट झाली आहे. दरवर्षी एक तरी पेपर फुटीचे प्रकरण होणार राज्यात आधीच शिक्षणाचा बट्याबोळ झाला आहे.त्यातच आज सारथी, बार्टी, महाज्योती CET परीक्षा पेपर फुटला आहे. यावर आपल्याला विध्यर्थ्यांचा आक्रोश पाहायला मिळाला विध्यार्थानी शिकावे कि नाही आता असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्रातील मागील दोन वर्षाची परिस्थिती पाहीलीतर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग देशातील प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासाठी पीजीआय तयार करतो. हा निर्देशांक राज्य/केंद्रशासित प्रदेश स्तरावरील शालेय शिक्षण प्रणालीच्या कामगिरीचे मूल्यांकन करतो. तर महाराष्ट्राने निर्देशांकात 1000 पैकी 583.2 गुण मिळवले आहेत; गुजरातने 599,केरळ ६०९.७; दिल्ली ६३६.२; पुडुचेरी ५९२.७; आणि तामिळनाडू 590.4. यात देखील महाराष्ट्र कमी पडला आहे.
शिक्षण परिणाम आणि गुणवत्ता (LO), उपलब्धता (A), पायाभूत सुविधा (IF), इक्विटी (E), प्रशासकीय प्रक्रिया (GP), आणि शिक्षक शिक्षण आणि प्रशिक्षण (TE आणि T) यावर आधारित मूल्यमापन राज्यांची 10 श्रेणींमध्ये विभागणी करते. या गटात 240 पैकी केवळ 65.8 गुणांसह महाराष्ट्राने LO च्या बाबतीत खराब कामगिरी केली आहे. तसेच IF श्रेणीत महाराष्ट्राला 190 पैकी केवळ 73.4 गुण मिळाले आहेत. शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्राचे भविष्य आंधारात चाले आता असेच दिसून येत आहे.












