पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित भालबा केळकर आणि राजा नातू आंतर शालेय नाटिका स्पर्धेसंदर्भातील शिक्षकांची पहिली सभा दि. 4 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे.
सभा इंदिरा मोरेश्वर सभागृह, डीएसके चिंतामणी, अप्पा बळवंत चौक येथे होणार आहे. भालबा केळकर नाटिका स्पर्धेसंदर्भातील शिक्षकांची सभा दुपारी 3 वाजता तर राजा नातू नाटिका स्पर्धेसंदर्भातील शिक्षकांची सभा दुपारी 4 वाजता आयोजित करण्यात आली आहे. दोन्ही गटातील शिक्षकांनी सभेच्या वेळेपूर्वी एक तास हजर राहणे आवश्यक आहे, असे संस्थेतर्फे कळविण्यात आले आहे.
सभेदरम्यान शिक्षकांना स्पर्धेचे फॉर्म दिले जाणार आहेत. त्याच प्रमाणे स्पर्धेच्या नियमांची माहिती, शिक्षकांसाठी प्रशिक्षण कधी घेण्यात येणार आहे याची माहिती दिली जाणार आहे.












