पुणे : पुणे लोकसभा पोटनिवडणूक लावकातल्या लवकर घ्या मुंबई हायकोर्टाच्या या निर्णयाला प्रीम कोर्टाने आज स्थागिती दिली आहे. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीला थोडाच वेळ बाकी आहे. त्या अनुषंगाने पोटनिवडणूक आता नको असे सुप्रीम कोर्टाने म्हंटले आहे. भाजप खासदार गिरीश बापट यांचे २९ मार्च ला निधन झाले त्यानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली.
त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर सहा महिन्यांत पोटनिवडणूक घेणे आवश्यक असतानाही आयोगाने निवडणूक न घेतल्याने पुण्यातील रहिवासी सुघोष जोशी यांनी ॲड. कुशल मोरे, ॲड. श्रद्धा स्वरूप आणि ॲड. दयाल सिंघला यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
यावेळी याचिकाकर्त्यांना सुप्रीम कोर्टानं चार आठवड्यांची मुदत दिली आहे. तसेच पुढील सुनावणी सात आठवड्यांनी घेण्यात येणार आहे. या सुनावणीवेळी पोटनिवडणुकांबाबत कायद्याची स्पष्टता करू, असंही सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. पण सात आठवड्यांनी सुनावणी होईपर्यंत निवडणुका जाहीरही होण्याची शक्यता आहे.यावेळी याचिकाकर्त्यांना सुप्रीम कोर्टानं चार आठवड्यांची मुदत दिली आहे. तसेच पुढील सुनावणी सात आठवड्यांनी घेण्यात येणार आहे. या सुनावणीवेळी पोटनिवडणुकांबाबत कायद्याची स्पष्टता करू, असंही सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. पण सात आठवड्यांनी सुनावणी होईपर्यंत निवडणुका जाहीरही होण्याची शक्यता आहे.












