मागासवर्ग आयोगाच्या कामकाजात सरकारकडून हस्तक्षेप केला जात असल्याच्या कारणावरुन आनंद निरगुडे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर राज्य सरकारने सुनील शुक्रे यांची मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदी शासनाने छत्रपती संभाजीनगर येथील ओमप्रकाश जाधव यांची नियुक्ती केली आहे. तर पुण्याचे मारुती शिकारे आणि नाशिकचे मच्छिंद्रनाथ तांबे यांनाही राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य करण्यात आले आहे.












