भारताची पहिलीच सौरमोहीम, आदित्य एल-1 ही यशस्वीपणे पार पाडून इस्रोने नवा इतिहास रचला आहे. 2 सप्टेंबर 2023 रोजी या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले होते. सुमारे चार महिन्यांचा प्रवास करून आदित्य एल-1 हा उपग्रह लॅग्रेंज पॉइंटवर प्रस्थापित या ठिकाणी पोहोचला.
पंतप्रधान मोदींनी एक्स पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य’एल-१ हा ११० दिवसांचा प्रवास करत 15 लाख किलोमीटर अंतर कापले.
आदित्य-एल १’ ही अवकाशीय सौर वेधशाळा असून, ती सूर्याच्या बाह्य वातावरणाचा अभ्यास करणार आहे. हा यशस्वी टप्पा पार केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इस्रोचे अभिनंदन व्यक्त केले आहे.
भारताने आणखी एक टप्पा पूर्ण केला आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला. भारताची पहिली सौर वेधशाळा आदित्य एल१ हे उपग्रह निश्चितस्थळी पोहोचले आहे.












