राजकीय लोकांनी जातीत वाद लावला तर एकत्र काम करणाऱ्यांनी काय करायचं ? -विलास लांडे यांचा सवाल
इंद्रायणी साहित्य संमेलनाची सांगता
पिंपरी(प्रतिनिधी) राज्यात काय चालले आहे काहीच कळत नाही राजकीय लोकांनी जातीत वाद लावला तर विविध संस्थेत एकत्र काम करणाऱ्यांनी काय करायचं असा सवाल माजी आमदार विलास लांडे यांनी येथे केला आरक्षण मिळायचं ते मिळेल पण जाती-जातीत वाद लावणारे नेत्यांना जागेवर आणा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
मोशी येथे इंद्रायणी साहित्य परिषद आयोजित दुसऱ्या इंद्रायणी साहित्य संमेलनाच समारोप आज झाला याप्रसंगी लांडे बोलत होते. यावेळी जेष्ठ पत्रकार संजय आवटे शिवचरित्र अभ्यासक अनिल पवार राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रकाश रोकडे, इंद्रायणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष संदीप तापकीर संमेलनाचे अध्यक्ष सोपान खुडे स्वागताध्यक्ष गणेश सस्ते समन्वयक व निमंत्रक अरुण बोऱ्हाडे उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी आमदार लांडे म्हणाले की इंद्रायणी साहित्य संमेलन कार्यक्रमास राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील येणार होते मात्र पोलिसांनी सांगितले की तुम्ही आलात तर दगडफेक होईल. काय चालले आहे महाराष्ट्रात हेच कळत नाही असे लांडे म्हणाले. माणसांना साहित्याची ओढ असली पाहिजे असे ते म्हणाले.
शिवचरित्र अभ्यासक अनिल पवार म्हणाले की, केवळ युद्धाचा विचार न करता प्रजेला सुखी समृद्ध करण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले.
संजय आवटे म्हणाले की , समाज अस्वस्थ असताना कवी , लेखक आणि साहित्यिकांनी भूमिका घ्यायला हवी. साहित्यिक असताना दंगली होतातच कशा ? सांस्कृतिक सपाटीकरणाचे प्रयत्न त्यांनी थांबवले पाहिजे. आम्ही म्हणू तोच भारत, अशी संकल्पना मांडली जात आहे.
यावेळी विकास कंद, ( सांस्कृतिक देहू) ,ज्ञानेश्वरी अभ्यासक रामदास जैद, (चिंबळी),अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. सुहास कांबळे, (मोशी),इतिहासकार जितेंद्र माळी, (दिघी),उद्योजक मोहन भोसले, चऱ्होली, स्वकामचे अध्यक्ष सुनील तापकीर- आळंदी, गडकोट अभ्यासक निलेश गावडे, चिंचवड, संस्कृती संशोधक नजिम शेख आळंदी, ह.भ.प. राजेश बोराटे(मोशी), कराटे प्रशिक्षक गोरखनाथ मोरे (चिखली) विशेष पुरस्कार सीए संदीप आसवले-डुडूळगाव, सविता खराडे, पिंपरी (कष्टकरी महिला संघटन) विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाना शिवले यांनी केले.
याआधी शिवराज्याभिषेकाचे महत्त्व या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, कान्होजी आंग्रे यांचे वंशज श्रीमंत रघुजी राजे आंग्रे, कान्होजी राजे जेधे यांचे वंशज दिग्विजय जेधे यांनी सहभाग घेतला. राजेंद्र घावटे यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी दिग्विजय जेधे म्हणाले की, जिजाऊ आणि शहाजीराजांकडून छत्रपती शिवाजी महाराजांवर स्वराज्याचे संस्कार झाले. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी कृती केली राज्य करायचे झाले तर राज्याभिषेक करायला हवा ही दूरदृष्टी शिवरायांकडे होती. असे ते म्हणाले.
श्रीमंत रघुजी राजे अंग्रे म्हणाले की, राज्याभिषेक हा केवळ एक सोहळा नव्हता तर ती आकाशवाणी होती त्याच्याकडे वाटचाल करण्याचा संदेश त्यातून दिला गेला राज्याभिषेकाच्या वेळी भाषा शुद्धी करण्यात आली कोणतीही दळणवळणाची साधने नसताना हा प्रयोग करणे इतके सोपे नव्हते असे ते म्हणाले.
पांडुरंग बलकवडे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी देशातील प्रस्थापित मुघल पोर्तुगीज डच इंग्रज यांच्याशी संघर्ष करून स्वराज्याची स्थापना केली.शेकडो वर्षाच्या गुलामीत असलेल्या हिंदूंना मुक्त करून स्वराज्य म्हणजे काय हे दाखवून दिले केवळ स्वराज्य मिळवले नाही तर त्याचे सुराज्य ही करून दाखवले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सीमा काळभोर, रामभाऊ सासवडे, योगेश कोंढाळकर, अलंकार हिंगे, श्रीहरी तापकीर, पौर्णिमा कोल्हे, दामोदर वहिले, नागनाथ बळते ,सुनील सस्ते जाधव, हिरामण सस्ते, अशोक ढोकळे ,काळूराम सस्ते, गणेश सस्ते ,माणिक सस्ते ,राजेश बोराटे, महिपती साठे यांनी विशेष परिश्रम घेतले.












