विद्यार्थी,सेवानिवृत्त व्यक्ती हे पार्ट टाइम कामाच्या शोधात असतात पण हाच पार्ट टाइम जॉब (Part time job) आपली फसवणुक करू शकतो याच प्रकारची घटना नारायण पेठेत घडली आहे.
फिर्यादी यांनी आपल्या मोबाईल वरून एक व्हाट्सअप युट्युब व्हिडिओ पाहून लाईक करून टास्क पूर्ण केल्यास पैसे मिळतील असा मेसेज आला होता. पण यामध्ये जॉईन होण्यासाठी आधी पैसे भरायला फिर्यादी यांना सांगितले. काही टास्क सुरुवातीचे फिर्यादींनी पूर्णही केले. या टास्कचे पैसे त्या इसमाने फिर्यादींच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर केले होते. या प्रकारे फिर्यादींचा विश्वास इसमाने संपादन केला. काही कालावधीनंतर टास्क पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये अज्ञात इसमांकडून त्रुटी काढण्यात येत होती. नवीन टास्क साठी इसम पैसे पाठवण्यास सांगत होता. फिर्यादींची16 लाख 87 हजार 666 रुपयांची फसवणूक केली आहे.
याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशन शिवाजीनगर पुणे येथे भादविक 420 ,34 सह आयटी ॲक्ट ६६ डी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पार्ट टाइम जॉब पडला महागात (Part time job)












